अध्यक्षपदावर पहिल्या गोमंतकीय महिला
प्रतिनिधी /राय
उत्तर गोवा ग्राहक मंचच्या गोव्यातील पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून हल्लींच निवृत्त झालेल्या जिल्हा न्यायाधीश तसेच औद्योगिक लवादाच्या माजी अध्यक्षा बेला नायक आज सोमवारी त्या आपल्या पदाचा ताबा घेणार आहेत.
निवड समितीने नायक यांच्या नावाची राज्य सरकारकडे शिफारस केली होती. ही शिफारस राज्य सरकारने मंजूर केली आहे. बेला नायक हल्लींच जिल्हा न्यायाधीश म्हणून ऩिवृत्त झाल्या होत्या.
गेल्या काही महिन्यापासून उत्तर गोवा ग्राहक मंचला पूर्णवेळ अध्यक्ष नव्हता. बेला नायक यांची या पदावर आता नियुक्ती झाल्यामुळे उत्तर गोव्यातील पडून असलेल्या ग्राहक मंचातील खटल्यांची सुनावणी आता होणार आहेत.