Tarun Bharat

निवृत्त सैनिकांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार

Advertisements

सावंतवाडी / प्रतिनिधी-

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा सावंतवाडी व देशभक्त गव्हाणकर कॉलेज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय सैन्य दलाच्या निवृत्त सैनिकांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय संचालक श्री पंढरी परब प्रमुख पाहुणे म्हणून तसेच सावंतवाडी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व कळसुलकर इंग्लिश स्कूल प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय श्री अल्ताफ खान सर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय स्वातंत्र्य समराचे विविधांगी पैलू उलघडून सांगितले त्याचप्रमाणे अनेक स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाची माहिती दिली भारतातील सैन्य दलाच्या वीरांची विरगाथा उपस्थितांपर्यंत पोहोचवली व उपस्थित विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले

या कार्यक्रमाच्या वेळी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव सोसायटीच्या सावंतवाडी शाखेचे व्यवस्थापक श्री शशांक विचारे, श्री महेश तानावडे, देशभक्त गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस व लोकमान्य एज्युकेशनचे समन्वयक श्री महेश सातवसे, सावंतवाडी तालुक्यातील निवृत्त सैनिक संस्थेचे सभासद, संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Stories

चिपीतून विमानोड्डाण 26 जानेवारीपूर्वीच?

NIKHIL_N

राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी

Sumit Tambekar

कणकवली नगराध्यक्षांची कार जप्त

NIKHIL_N

परशुराम घाटात पुन्हा खोदाई सुरू!

Patil_p

देवगड हापूस मुंबई मार्केटमध्ये ‘गडगडला’

NIKHIL_N

पालिकेचे कोविड सेंटर आहे कुठे?

NIKHIL_N
error: Content is protected !!