Tarun Bharat

आचरा ग्रामपंचायत तर्फे सेवानिवृत्त सैनिकांचा गौरव

आचरा / प्रतिनिधी-

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले.त्यांच्या त्यागातून मिळालेल्या या भारत देशाला महासत्ता बनविण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे. देशप्रेम काय असते आणि देशाप्रती समर्पित भावना कशा असाव्यात, हे देशाच्या तिन्ही सैन्य दलांतील सैनिकांकडून शिकावे. देशासाठी सर्व काही पणाला लावून प्रत्येक युद्धात लढलेल्या माजी सैनिकांचे योगदान फार मोठे आहे. देशाच्या या खऱ्या संपत्तीचा येणाऱ्या प्रत्येक पिढीने आदर, मानसन्मान ठेवला पाहिजे. हे सैनिक देशाची शान तर आहेतच त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचा ते अभिमान आहेत असे प्रतिपादन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी आचरा येथे केले.
आचरा ग्रामपंचायत तर्फे सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर आचरा सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, व इतर उपस्थित होते.

Related Stories

गुहागर आगारातच बस पंक्चर, वाहतूक कोंडीत भर

Patil_p

आर्थिक संकटातील आंबा उत्पादकांची शासनाने घ्यावी दखल

Patil_p

वेंगुर्ले उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांचा राजीनामा

NIKHIL_N

दापोली खरेदी विक्री संघात भात खरेदीचा शुभारंभ ठरला

Archana Banage

‘शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात’ या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची दिलगीरी

Abhijeet Khandekar

रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४ माध्यमिक शाळा सुरु

Archana Banage