Tarun Bharat

परतीच्या पावसाने पुन्हा शहरासह उपनगराला झोडपले

दमदार पाऊस सर्वत्र पाणीच पाणी

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : सोमवारी दुपारी शहरासह उपनगराला दमदार पावसाने झोडपले. अनगोळ परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. गणेशोत्सव काळात पावसाने झोडपल्याने साऱ्यांची तारांबळ उडाली.

सोमवारी सकाळी 11:00 च्या दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतरच्या सुमारास जोरदार पावसाचे आगमन झाले. शहरापेक्षाही अनगोळ परिसरात दमदार पाऊस झाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून होते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे अनगोळ परिसरातील साऱ्यांची तारांबळ उडाली. अनगोळ बरोबरच येळ्ळूर, मजगाव, उद्यमबाग, आनंदनगर या परिसरात ही पाऊस झाला.

Related Stories

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम

Patil_p

निदर्शनांच्या शक्यतेमुळे पोलिसांचे शहरात शक्तिप्रदर्शन

Amit Kulkarni

शहरातील बसथांबे बनले पार्किंग तळ

Amit Kulkarni

मराठा मंदिरतर्फे पंतप्रधान निधीला लाखाचा निधी

Patil_p

रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनचा अधिकारग्रहण समारंभ

Patil_p

शेषगिरी कॉलेज येथे केएलई संस्थेचा स्थापना दिन साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!