Tarun Bharat

बँक मॅनेजरच्या हत्येचा 13 दिवसांत बदला

शोपियान चकमकीत दोन दहशतवादी ठार ः लष्कर-ए-तोयबाशी संबंध

श्रीनगर / वृत्तसंस्था

राजस्थानचे बँक मॅनेजर विजय यांच्या हत्येचा 13 दिवसांत सुरक्षा दलांनी बदला घेतला आहे. काश्मीरमधील शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असून त्यापैकी एकाने कुलगाममध्ये बँक डय़ुटीवर असताना विजय यांना गोळय़ा घातल्या होत्या. बुधवारी शोपियान जिल्हय़ातील कांजिलूर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यादरम्यान दोन्ही दहशतवादी मारले गेले. यापैकी एक दहशतवादी बँक मॅनेजरच्या हत्येत सामील होता, असे काश्मीरचे आयजीपी विजयकुमार यांनी सांगितले.

सुरक्षा दलांकडून खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे जान मोहम्मद लोन आणि तुफैल गनी अशी आहेत. या दोघांचे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. दहशतवादी जान मोहम्मदने बँक मॅनेजर विजय यांच्यावर गोळय़ा झाडल्या होत्या. या घटनेनंतर विजय यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना वाचवण्यात अपयश आले होते. राजस्थानच्या हनुमानगढ येथील रहिवासी असलेल्या विजयकुमारचे 4 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. महिन्याभरापूर्वीच त्याची पत्नीही विजयसोबत गेली होती. विजयकुमार हे कुलगाम जिल्हय़ातील अरेह मोहनपोरा येथे असलेल्या इलाकाई देहाती बँकेत (ईडीबी) व्यवस्थापक होते. हल्ल्यानंतर लगेचच जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसराला वेढा घातला. तेव्हापासून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. अखेरीस बुधवारी दहशतवादविरोधी मोहिमेला यश आले.

Related Stories

संसदेत महिला सदस्यांकडून 50 टक्के आरक्षणाची मागणी

Patil_p

हिमवृष्टीत अडकलेल्या 230 जणांना एअरलिफ्ट

Patil_p

केरळच्या बजेटकॉपीवर गांधीहत्येचे छायाचित्र

prashant_c

शेतकरी आंदोलक आक्रमक; भाजपा नेत्याचे फाडले कपडे

Archana Banage

देशात महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत दैनंदिन कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येने नोंद

Tousif Mujawar

आणखी एका जैन संतांचा प्राणत्याग

Patil_p