मालवण/प्रतिनिधी
आचरा मंडळ अधिकारी यांच्या पाथकाने आज कारवाई करत आचरा मालवण रोड वरती कोळंब या ठिकाणी विनापरवाना वाळू वहतूक करणारा एक डंपर ताब्यात घेऊन मालवण तहसील ऑफिसला जमा केला. या पथकामध्ये श्री अजय परब मंडळ अधिकारी आचारा, श्री योगेश माळी तलाठी भटवाडी, श्री संतोष जाधव तलाठी चिंदर, श्री अनिल काळे तलाठी आचारा, श्री ए. के. देसाई तलाठी माळगाव, श्रीम. प्रीतम भोगटे तलाठी हडी, श्रीम. यू.एन.पाटील तलाठी रेवंडी तसेच पोलीस कॉनस्टेबल सरकुंडे, पोलीस कॉन्स्टेबल आचरेकर इत्यादी सहभागी होते