राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर : नवरात्रौत्सवात भाविकांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे निर्देश : जिल्हाधिकारी कार्यालयात नवरात्रौत्सव तयारीसंदर्भात आढावा बैठक
प्रतिनिधी/कोल्हापूर
गेल्या चार-पाच वर्षापासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे विविध विकासकामे सुरु आहेत. परंतु ही कामे मुदतीत पूर्ण होत नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. त्यांना सोयी सुविधा पुरवाव्यात. देवस्थान समितीची प्रलां†बत कामे तात्काळ मार्गी लावावीत आणि प्रस्तावित आराखडय़ांच्या प्रती सादर कराव्यात, असे निर्देश देऊन यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मंत्रालयस्तरावर बैठक घेतली जाईल, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात नवरात्रौत्सव तयारी आणि प्रलंबित कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, उप- अभियंता सुयश पाटील, लेखापाल धैर्यशील तिवले, वास्तुविशारद राजेंद्र सावंत, वास्तुविशारद मनोज पंडीत, रणजीत निकम आदी उपस्थित होते.
नवरात्रौत्सवात देवस्थान सा†मतीच्यावतीने भाविकांसाठी पार्किंग, मंडप व्यवस्था, स्वच्छतागृह, मंदिर परिसरातील दुकानदारांच्या समस्या, सुरक्षा रक्षकांकडून भाविकांशी होणारे वाद, भाविकांच्या मालमत्तेची सुरक्षा, देवस्थान समिती अंतर्गत सुरु असलेली विकासकामे, त्यातील प्रलंबित कामे, प्रस्तावित विकास कामे याबाबत क्षीरसागर यांनी सुरुवातीला माहिती घेतली.
हे ही वाचा : ‘प्राधिकरणा’च्या गावातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घ्या
क्षीरसागर म्हणाले, नवरात्रोत्सव काळात मां†दरात होणाया कार्यक्रमात पूर्वापार कार्यक्रम करणाया कलाकारांनाही सामावून घ्यावे. मां†दर परिसरात होणाया चोया रोखण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुंडांना ताब्यात घेण्याबाबत पोलीस प्रशासनास सूचना कराव्यात. फिरस्त्यांकडून भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आगामी काळात काम रखडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
शिवराज नाईकवाडे म्हणाले, नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी व्यापायांच्याशी संवाद साधून मंदिर परिसरातील कोणतेच रस्ते बंदिस्थ करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर परिसरात 100 सी.सी.टी.व्ही. द्वारे लावून भाविकांच्या सुरक्षिततेवर करडी नजर ठेवली जाणार आहे. सुरक्षा रक्षकांना भाविकांशी योग्य वर्तन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कोणतेही गैरवर्तन केल्यास तात्काळ सेवेतून निलंबित करण्याचा सूचना दिल्या आहेत.
‘कोविड’ मुळे कामे प्रलंबित
देवस्थान समिती अंतर्गत सुरु असलेली कामे गेल्या दोन वर्षात कोविड संसर्गामुळे प्रलंबित पडली आहेत. त्यातील श्री. जोतीबा मंदिर येथे दर्शन मंडप आणि स्वच्छता गृहाचे काम दिलेल्या वाढीव मुदतीत पूर्ण होईल. इतर विकासकामे ही तांत्रिक बाबीची पूर्तता करून सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. श्री क्षेत्र जोतीबा मंदिर परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचपद्धतीने श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची आवश्यकता आहे. श्री अंबाबाई मां†दर तीर्थक्षेत्र विकास निधी यासह मंदिर परिसरात भाविकांना मुलभूत सोईसुविधा देण्याकरिता आवश्यक विकास कामांचे आराखडे नियोजन विभागाच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. श्री अंबाबाई मां†दरातील दर्शन मंडपासाठी तीन जागांची चाचपणी सुरु असून, संबंधित विभागांशी चर्चा सुरु आहे.