आमदार विरेश बोरकर यांचा दावा
प्रतिनिधी /पणजी
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष हा मागे राहिला नसून सर्व मतदारसंघामध्ये सक्रीयरित्या कार्य करत आहे. शेवटच्या क्षणी करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणाची लवकरच तपासणी केली जाणार आहे. आरक्षण व्यवस्थितरित्या करण्यात आले नाही. रिव्होल्युशनरी गोवन्सच्या उमेदवारांना भाजपकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपला गाव वाचविण्यासाठी हे उमेदवार पुढे सरसावले आहेत. रिव्होल्युशनरी गोवन्सचे उमेदवार हे विकले जाणारे नाही असा दावा सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
आगशी पंचायतीचा प्रभाग क्र. 1 सामान्य होता. परंतु शेवटच्या क्षणाला आरक्षित करण्यात आला. बहुतांश ठिकाणी पंचायत निवडणूकीसाठी भाजपचे असलेल्या उमेदवारांच्या प्रभागात आरक्षण देण्यात आले आहे. तर विरोधकांचे उमेदवार उभे राहिले त्याठिकाणी ओबीसी आरक्षण देण्यात आले नाही. आगशी पंचायत प्रभाग क्र. 1मध्ये ओबीसी आरक्षण देण्यात आले. शेवटच्या क्षणाला खेळी खेळण्याची सवय भाजपची आहे. भाजपने आपल्याला पाहिजे त्याठिकाणी ओबीसी आरक्षण दिले असल्याचा आरोप बोरकर यांनी केला.
आगशी पंचायतीसाठी रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे उमेदवार उभे केले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे ः प्रभाग क्र. 2 – डॉरेटी बार्रेटो, प्रभाग क्र. 4 – डायना डिमेलो, प्रभाग क्र. 5 – ज्युलियस आल्मेदा, प्रभाग क्र. 7- दीपक गावस, प्रभाग क्र. 8- विशांत नाईक, प्रभाग क्र. 9- मनुष्का रॉड्रीगीस, प्रभाग क्र – लक्षदीप गावस, प्रभाग क्र. 11- बेंजामिता इस्त्याँव. अपक्षही पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती आमदार विरेश बोरकर यांनी दिली.