Tarun Bharat

भात खाण्याने खरचं वजन वाढते का? जाणून घ्या संशोधन काय सांगते

Advertisements

Rice Health Benefits : आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे लोकांच्या खाण्यापिण्यावर परिणाम झाला आहे. परिणामी अनेकांना लठ्ठपणाला सामोरे जावं लागत आहे. वाढत वजन ही समस्या एका बाजूला तर वाढलेल्या वजनाने होणारा त्रास दुसऱ्या बाजूला. यामुळे अनेकजण त्रासले आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे डाएट प्लॅन फॉलो केले जात आहेत. सगळ्यात आधी ताटातून भात काढा असाही ट्रेंड आजकाल सुरु आहे. पण त्याची वास्तविकता तुम्हाला माहीत आहे का? भात खाल्ल्याने खरच लठ्ठपणा वाढतो का? भात खाल्याने खरंच वजन वाढत का? संशोधनात काय सांगितले आहे. याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

आहारतज्ञांचे काय म्हणणे आहे
आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो असे मानणे योग्य नाही. लठ्ठपणा वाढण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यास अहवालात असेही म्हटले आहे की, भातामुळे लठ्ठपणा वाढत नाही. कारण त्यात कॅलरीज खूप कमी असतात. एक कप भातातही मध्यम आकाराच्या रोटी इतक्याच कॅलरीज असतात.

संशोधन अहवाल काय म्हणतो?
-संशोधन अहवालात असे म्हटले आहे की, एक कप तांदळाचा वापर वाढवला तरी जागतिक लठ्ठपणाचे प्रमाण केवळ एक टक्क्याने वाढू शकते. याचे कारण असे की भात खाल्ल्याने भातामध्ये असलेले फायबर, पोषक घटक आणि वनस्पती संयुगे यासारख्या पोषक तत्वांमुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते आणि यामुळे जास्त खाणे टाळता येते. याचा फायदा वजन वाढत नाही कंट्रोलमध्ये राहते.

-भातामध्ये फॅटचे प्रमाणही कमी असते आणि त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाणही नियंत्रणात राहते. यामुळे इन्सुलिनचा स्राव कमी होतो. वजन न वाढण्यामागे हेही प्रमुख कारण आहे.

-तांदळाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक पांढरा तांदूळ आणि दुसरा तपकिरी तांदूळ. या दोन तांदळातील प्रमाण जाणून घेऊया.

पांढरा तांदूळ
पौष्टिकतेबद्दल बोलायचे झाल्यास सुमारे १८६ ग्रॅम पांढऱ्या शिजवलेल्या भातामध्ये २४२ किलो कॅलरीज असतात. ४.४३ ग्रॅम प्रथिने, ३९ ग्रॅम फॅट, ५३.२ ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि ५६ ग्रॅम फायबर असते. याशिवाय यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात.

ब्राऊन राइस
शिजवलेल्या ब्राऊन राइसमध्ये २४८ किलो कॅलरी, ५.५४ ग्रॅम प्रथिने, २ ग्रॅम फॅट, ५१ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ३.२ ग्रॅम फायबर, फोलेट, लोह आणि इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

-तांदूळ हे उच्च कार्ब आणि पिष्टमय पदार्थ असणारे धान्य आहे. जे लोक भरपूर भात खातात त्यांच्यात वजन वाढण्याची शक्यता खूप कमी असते. याउलट ब्राऊन राइस खाणे जास्त आरोग्यदायी आहे.

-भात खाल्याने वजन कमी होण्यासही मदत होते हे जरी खरे असले तरी आरोग्यदायी तांदुळ निवडा. कमी प्रक्रिया केलेला तांदूळ खाणे फायदेशीर ठरू शकते.

Related Stories

भारताच्या प्रत्युत्तराने POK चे मोठे नुकसान; नेत्यांची कबुली

datta jadhav

भरभर खाल्ल्यास भरभर वाढते वजन

Patil_p

क्लॉस्ट्रोफोबिया म्हणज काय ?

Omkar B

डायव्हर्टिक्युलायटिस आणि पथ्याहार

Omkar B

मक्यामुळे प्रोटीनचा पुरवठा

Amit Kulkarni

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!