Tarun Bharat

पालिकेच्या नव्या इमारतीच्या खोदकामादरम्यान आढळल्या रायफलीच्या गोळ्या

प्रतिनिधी / सातारा :

पालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाकरता पाया खोदण्याचे काम सदरबाजार येथील कल्याणी परिसरात सुरु आहे. तेथे खोदकाम करत असताना जेसीबीच्या दाताला एक लोखंडी बॅरलवजा वस्तू लागली. त्यामध्ये एक हजारहून अधिक रायफलीच्या जुन्या गोळय़ा आढळून आल्या. ही बाब सातारा शहर पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून, या सापडलेल्या रायफलीच्या गोळय़ा पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सातारा पालिकेच्या नूतन इमारतीचे काम कल्याणी परिसरात सुरु आहे. त्याकरता पायासाठी खोदकाम जेसीबीच्या सहाय्याने सुरु असून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने खोदत असताना जेसीबीच्या दाताला एक लोखंडी छोटय़ा बॅरलवजा वस्तू लागली. त्यामध्ये सुमारे एक हजारहून अधिक रायफलीच्या गोळय़ा व इतर गंजलेले साहित्य आढळून आले. या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना काम करणाऱ्या कामगारांनी दिली. तसेच सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनाही याची माहिती दिली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या सुचनेनुसार लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे हे घटनास्थळी कर्मचारी घेवून पोहचले. त्यांनी त्या गोळय़ा ताब्यात घेतल्या असुन अजून काही हाती येते काय याची तपासणी करत आहेत. दरम्यान, या गोळय़ा कोणत्या कालावधीतील असू शकतील याच्या तपासासाठी या गोळय़ा पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी सांगितले.

सर्व गोळय़ा गंजलेल्या

आढळून आलेल्या सर्व गोळय़ा या गंजलेल्या अवस्थेतील असून, त्याच बरोबर जे साहित्य आढळून आले तेही सर्व गंजलेल्या स्थितीत आहे. फक्त या गोळय़ा वजनाने जड असून, पुरातत्व विभागाचे अधीक्षक प्रवीण शिंदे यांना अजूनही त्या गोळय़ाबाबत काही माहिती नसल्याचे समजते.

Related Stories

बनावट दस्तप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

Patil_p

राजमाता श्री.छ.कल्पनाराजे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतली भेट

Archana Banage

जिल्हाधिकाऱयांची पत्रकार परिषद रद्द

Amit Kulkarni

ई- पास वगळता 25641 नागरिक जिह्यात दाखल

Patil_p

नक्षलवाद्यांनी एकाच कुटुंबातील चौघांना लटकवले फासावर

datta jadhav

फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे निधन

datta jadhav