Tarun Bharat

कोल्हापुरात देसाई यांच्या कार्यकर्त्यांच्या घरावर पुन्हा हल्ला: कार पेटवत केली प्रचंड तोडफोड

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

कोल्हापूर: फुलेवाडी रिंगरोड वरील रिंकू देसाई यांच्या घरावर काल अज्ञातांनी हल्ला केला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा देसाई यांच्या कार्यकर्त्यांच्या घरावर हल्लेखोरांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्ला करत प्रचंड तोडफोड केली आहे. हल्लेखोरांनी कार पेटवून देत जवळपास अर्धा तास दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाकडे पोलिसांनी आता गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्यां कडून होत आहे.

दोन गटात राडा16 मे रोजी वाढदिवसाचे बॅनर फाडल्यावरुन बोन्द्रेनगर आणि लक्षतीर्थ वसाहत मधील दोन गटात राडा झाला होता. त्या कारणावरून रविवारी मध्यरात्री हल्लेखोरांनी फुलेवाडीतील विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा हल्लेखोरांनी देसाई यांचे कार्यकर्ते असणारे शिंगणापूर मधील वरेकर यांच्या घरावर देखील हल्ला केला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना शिंगणापुर येथे घडली आहे. दरम्यान याबाबतची तक्रार देणार असल्याची माहिती वरेकर कुटुंबीयांनी दिली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत जवळपास तीन तरुण शिंगणापूर येथील वरेकर कुटुंब राहतात याठिकाणी आले. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत घराच्या खिडकीच्या काचा आणि दरवाजाची तोडफोड केली आहे. तसेच दारात लावलेल्या एका कारची ही तोडफोड करून प्रचंड दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.दारात उभी असलेली कार पेटवण्याचा देखील प्रयत्न हल्लेखोरांनी केला. अशी माहिती वरेकर कुटुंबांनी दिली आहे. दरम्यान घरात कोणी नसल्यामुळे या प्रकरणात कोणालाही इजा झालेली नाही

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 511 पोलीस कोरोनाबाधित; 7 जणांचा मृत्यू

datta jadhav

संप सुरूच ठेवण्याचा संघटनांचा निर्धार

Abhijeet Khandekar

…मग भाजपनं म्हणायचं का पाठीत खंजीर खुपसला- अजित पवार

Archana Banage

यापुढे कोणावर काहीच बोलणार नाही : मंत्री मुश्रीफ

Archana Banage

इच्छूकांच्या डिजिटलवर महापालिकेचा हातोडा

Archana Banage

रशियाने कोरोनावरील लसीला दिली अधिकृत मंजुरी

datta jadhav