वृत्तसंस्था/ नॉटींगहॅम
डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत सहाव्या मानांकित ऍलीसन रिसेकी तसेच हदाद माइया यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात सहाव्या मानांकित रिसेकीने स्वीसच्या गोलुबिकचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. दुसऱया उपांत्य सामन्यात सातव्या मानांकित बियाट्रीज हदाद माइया ने मार्टिनकोव्हाचा 6-3, 4-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुखापतीमुळे मार्टिनकोव्हाने हा सामना अर्धवट सोडला. रिसेकीने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत डब्ल्यूटीए टुरवरील स्पर्धेत 13 व्यांदा एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.