100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा
लंडन / वृत्तसंस्था
लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा ऋषी सुनक यांचे नाव चर्चेत आले आहे. पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत उमेदवारांच्या यादीत सामील होण्यासाठी 100 खासदारांचा पाठिंबा त्यांना मिळाला आहे. सद्यस्थितीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते सुनक हे लिझ ट्रस यांची जागा घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. याचदरम्यान देशाचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सनही या शर्यतीत सामील होण्याच्या इराद्याने कॅरेबियन देशांमधून मायदेशी परतले आहेत. 42 वषीय सुनक यांना पाठिंबा देणाऱया खासदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, सुनक आणि जॉन्सन या दोघांनीही आतापर्यंत पक्षाचा नेता होण्यासाठी निवडणूक लढवण्याची औपचारिक घोषणा केलेली नाही. आतापर्यंत ‘लीडर ऑफ द कॉमन्स’ पेनी मॉर्डंट या एकमेव उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.