पोलीस अधिकारी मांडवलीत मग्न : भरवस्तीतील घरेही दरोडेखोरांकडून लक्ष्य : गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळणार तरी कधी?
प्रतिनिधी /बेळगाव
जेव्हा जेव्हा पोलीस यंत्रणा ढिली पडते तेव्हा गुन्हेगार शिरजोर होतात. हा आजवरचा अनुभव आहे. सध्या बेळगाव शहर व जिल्हय़ातील काही ठिकाणी घडलेल्या दरोडय़ांच्या घटना लक्षात घेता गुन्हेगार चांगलेच माजले असल्याचा प्रत्यय येत आहे. स्थानिक गुन्हेगारांबरोबरच महाराष्ट्रातील दरोडेखोरांच्या टोळय़ा सक्रिय झाल्या असून पोलीस दलासमोर त्यांनी तपासाचे आव्हान उभे केले आहे.
बेळगाव शहर व तालुक्मयात अधूनमधून दरोडे, लुटमारीच्या घटना सुरूच आहेत. हुक्केरी व अथणी तालुक्मयातही दरोडय़ाच्या घटना घडल्या आहेत. या एकाही प्रकरणाचा तपास लागला नाही. यापैकी काही प्रकरणात महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळय़ा सक्रिय असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असले तरी हे गुन्हेगार अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. केवळ एकाकी घरेच नव्हे तर भरवस्तीतील घरांनाही दरोडेखोरांनी लक्ष्य बनविले आहे.
निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीच्या खुनाचा नाही उलगडा
गेल्या महिन्यात यमकनमर्डी व कागवाड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडले आहेत. 14 जून 2022 रोजी मध्यरात्रीनंतर होसूर, ता. हुक्केरी येथील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराय अक्कतंगेरहाळ यांची पत्नी मालुताई (वय 60) यांच्या तोंडात बोळा कोंबून खून करण्यात आला आहे. खुनानंतर त्यांच्या अंगावरील दागिने लांबविण्यात आले आहेत.
प्रथमदर्शनी दरोडय़ाचा हा प्रकार असल्याचे उघडकीस आल्याने खून व दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तिजोरीतील दागिने तसेच होते. त्यामुळे दरोडेखोरांनी या एकाकी महिलेचा खून करून दागिने पळविले आहेत की इतर कोणत्या कारणासाठी मालुताई यांचा खून झाला आहे, याचा अद्याप तपास लागला नाही. सध्या तरी दरोडेखोरांच्या हातून मालुताई यांचा खून झाल्याची नोंद पोलिसात आहे.
कागवाडलाही दरोडय़ाची घटना
होसूर येथील घटनेच्या ठिक एक दिवस आधी 13 जून रोजी कवलगुड्ड, ता. कागवाड येथे नातप्पा शिवाप्पा काळेली यांच्या शेतातील घरावर दरोडा पडला. नातप्पा व त्यांच्या पत्नीवर हल्ला करून दरोडेखोरांनी 50 हजार रुपये रोख रक्कम व 20 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले आहेत. या दाम्पत्याला अथणी येथील खासगी इस्पितळात उपचार घ्यावे लागले.
कागवाड पोलीस स्थानकात दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात या घटनेमागे महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळय़ांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, या टोळीतील एकही गुन्हेगार अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. रविवारी ‘तरुण भारत’ने कागवाड पोलिसांशी संपर्क साधला, त्यावेळी तपास सुरू आहे. सुगावा लागला आहे, मात्र गुन्हेगार सापडले नाहीत, असे अधिकाऱयांनी सांगितले.
सराफी व्यावसायिकाच्या लूट प्रकरणी दोन गुन्हेगारांचा शोध जारी
या घटनेच्या दिवशीच 13 जून रोजी कुदेमनीहून आपल्या मोटारसायकलवरून बेळगुंदीकडे येणाऱया सराफी व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला करून 1 लाख 82 हजार रुपये किमतीचे 35 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली बॅग पळविल्याची घटना घडली आहे. सुभाष काकतीकर, रा. बेळगुंदी यांनी दुसऱया दिवशी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. अद्याप या प्रकरणातील दोघा गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलीस अधिकाऱयांना यश आले नाही.
कडोलीकडे जाणाऱया मार्गावर दुचाकीस्वारांची लूट
जून महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात अलतगा क्रॉसहून कडोलीकडे जाणाऱया मार्गावर दुचाकीस्वारांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील रोकड, दागिने लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. तीन ते चार घटना घडूनही एकानेही पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे धारिष्टय़ दाखविले नाही. रात्रीची कामे आटोपून बेळगावहून गावी परतणाऱया दुचाकीस्वारांना अडवून त्यांना लुटण्यात येत आहे. हे प्रकारही काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातच सुरू आहेत.
लुटारूंच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काही जणांनी खासगी इस्पितळात उपचार घेतले आहेत. पोलिसांचा त्रास नको, या भावनेतून किरकोळ लुटीनंतर पोलिसात जाण्यास कोणी तयार नाहीत. याच काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील होनगा येथे 22 मार्च 2022 रोजी प्रवीण निरंजन या उद्योजकाच्या घरात शिरलेल्या दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवून तिजोरीतील रोकड पळविल्याची घटना घडली आहे. या घटनेचाही अद्याप मागमूस लागलेला नाही.
चन्नम्मानगर दरोडय़ाचाही छडा नाही
अर्जुन कॉलनी, राणी चन्नम्मानगर येथील प्रकाश नाडगौडा यांच्या घरी 4 जून रोजी मध्यरात्री दरोडेखोर शिरले होते. प्रकाश यांची दरोडेखोरांबरोबर झटापटही झाली. झटापटीनंतरही दरोडेखोरांनी दागिने पळविल्याची घटना घडली आहे. उद्यमबाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. चौघे जण प्रकाश यांच्या घरात शिरले होते तर त्यांचे अन्य तीन साथीदार घराबाहेर थांबून होते. या प्रकरणाचाही अद्याप छडा लागलेला नाही.
खून प्रकरणे तर नेहमीचीच!
बेळगाव शहर व तालुक्मयात खून प्रकरणे नेहमीचीच झाली आहेत. अनेक खून प्रकरणांचा अद्याप छडा लागलेला नाही. पोलिसांना त्याचे गांभीर्यही उरलेले नाही. केवळ झटपट पैसा मिळविणे या एकाच उद्देशासाठी बेळगावात अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. सहा महिन्यात 16 जणांचे खून झाले आहेत. अनेक पोलीस अधिकारी फोन उचलत नाहीत. काही पोलीस स्थानकाचे दूरध्वनी ‘डेड’ आहेत. ज्या प्रकरणातून आपल्याला लाभ आहे, त्याच प्रकरणाच्या तपासात पोलीस रस घेत आहेत. म्हणून दरोडे, दरोडेखोर व इतर गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे.