महाग कारची विक्री वधारली
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना विषाणुच्या लाटेनंतर जीवन जगताना काही ठोस बदल होत गेले असल्याचे दिसून येत आहे. वाहन उद्योगामध्ये मोठा बदल होत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दोन वर्षांमध्ये महागडय़ा कारची विक्री ही स्वस्त कारच्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढली आहे, अशी माहिती देशातील पेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या रिसर्चमधून देण्यात आली आहे.
प्रारंभीच्या पातळीवर कार्सचा विचार करता 10 लाख रुपयांपेक्षा जादा किमतीच्या कार्सची वेगाने विक्री झाली आहे. सदरची विक्री होण्याची मुख्य कारणे दोन आहेत.
2021-22 मध्ये प्रिमियम सेगमेंट म्हणजे 10 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या कारच्या तुलनेत 5 पट तेजीने विक्री झाली आहे. प्राप्त अहवालानुसार प्रीमियम सेगमेंटची कार विक्री वर्षाला 38 टक्क्यांनी वाढली आहे. तर स्वस्त कारची विक्री ही वर्षाला 7 टक्के दराने वधारली आहे. 2021-22 मध्ये प्रीमियम कारचा बाजारातला वाटा 30 टक्के झाला आहे.
दुचाकींमधील बदल
दुचाकी विभाग पाहिल्यास यामध्ये 5-6 वर्षात 70 हजार रुपयांपेक्षा अधिक किमती असणाऱया गाडय़ांची विक्री कमी किमती असणाऱया स्कूटरपेक्षाही अधिक राहिली आहे. दुचाकी वाहनांमध्ये कंपन्या अधिक किमतीच्या सेगमेंटवर जादा लक्ष केंद्रीत करत आहेत.