Tarun Bharat

बिहार मंत्रिमंडळामध्ये आरजेडीला मोठा वाटा; नितीश यांना गृह तर तेजस्वींना आरोग्य खाते

Advertisements

ऑनलाईन टिम / पटना

जनता दल (युनायटेड) चे नेते नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. 36 मंत्र्याचं मंत्रिमंडळ असलेल्या बिहारमध्ये आज 31 जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे 16 आरजेडीचे, नितीश कुमार यांच्या जेडीयूचे 11, काँग्रेसचे दोन आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) च्या एका सदस्यांचा समावेश आहे.

आरजेडीला एकूण 16 मंत्रीपदे देण्यात आली. वाटप करण्यात आलेल्या खात्यांच्या यादीनुसार, नितीश यांच्याकडे गृह खाते, तर तेजस्वी यांना आरोग्य खाते देण्यात आले. महत्वाच्या खात्यापैकी एक असलेल्या वित्त खात्याची जबाबदारी विजय कुमार चौधरी यांच्याकडे देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांचे भाऊ तेज प्रताप यादव यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय देण्यात आले आहे. राज्यातील एकमेव सर्वात मोठा पक्ष असलेल्या RJDकडे अपेक्षेप्रमाणे सर्वात मोठा वाटा गेला आहे. आरजेडी कोट्यातून भूमिहार नेते कार्तिकेय सिंग, राजपूत नेते आणि सध्या प्रदेशाध्यक्ष असलेले जगदानंद सिंग याचा मुलगा सुधाकर सिंग यांचा सममावेश आहे.

Related Stories

‌उच्च न्यायालयाची बंदी झुगारत येरळा नदीपात्रातील वाळू उपसा सुरुच

Abhijeet Shinde

कोरेगावात आयपीएस अधिकारी रितू खोखर यांनी वाहतुकीला लावली शिस्त

Patil_p

जिल्ह्यातील १२ नागरिकांना डिस्चार्ज

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 4 लाख 98 हजार 756 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

पुणे विभागातील 1 लाख 18 हजार 779 कोरोनामुक्त

Rohan_P

पुस्तकावर तातडीने बंदी घाला : रणजित सावरकर

prashant_c
error: Content is protected !!