Tarun Bharat

अपघातानंतर प्रशासनाला आली जाग

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आणि गतिरोधक बसविण्याच्या कामाला गती मिळाली. भरधाव ट्रकने विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना आणि बुधवारी कॅम्प पाfरसरात लोखंडवाहू ट्रकची दुचाकीला धडक बसून विद्यार्क्षी जागीच ठार झाला. त्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. सरकारी काम आणि बारा महिने थांब अशीच ही कृती आहे. त्यामुळे यापुढे तरी अवजड वाहनांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी कायम आहे.

मागील तीन दिवसांत अवजड वाहनांमुळे दोन विद्यार्थ्यांचा जीव गेला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून अवजड वाहनांना शहरात ठराविक वेळेपुरतेच बंदी घालण्यात आली. बंदी घालण्यात आली तरी प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी याचा फटका बेळगावकरांना वारंवार बसत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला कॅम्प येथील एका बालकाचा जीव गेल्यानंतर जाग आली आणि दुसर्‍याच दिवशी गुरूवारी गतिरोधक बसविण्याच्या कामांना चालना देण्यात आली आहे.

Related Stories

पश्चिम भागात दमदार, अन्य भागात रिमझिम

Amit Kulkarni

देवदासींच्या पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज जाहीर करा

Amit Kulkarni

खादरवाडीत चैतन्यमय वातावरणात होतोय दुर्गामाता दौड

Patil_p

एपीएमसीत बायोगॅस उभारणीस प्रारंभ

Amit Kulkarni

जुन्या कार्यालयातील घटनेचा मनपा नोकर संघटनेकडून निषेध

Patil_p

पाणीपुरवठय़ात कपात, बिलात का नाही?

Amit Kulkarni
error: Content is protected !!