वार्ताहर /शिवोली
शिवोली थिएटर जंक्शन ते चोपडे पुलापर्यंत रस्ता रुंदीकरण कामाचा प्रारंभ नुकताच आमदार डिलायला लोबो यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी मार्ना सरपंच शर्मिला वेर्णेकर, उपसरपंच विल्यम फर्नांडिस, पंचसदस्य सिंपल धारगळकर, अमित मोरजकर, संदेश हडफडकर फरमिना फर्नांडिस व ग्रामस्थ उपस्थित होते. शिवोली परिसरातील रस्ते अऊंद असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. काहीवेळा रुग्णवाहिकाही अडकून पडतात. लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. ही बाब आमदार डिलायला लोबो यांनी लक्षात घेऊन सदर रस्ता ऊंदीकरणाचे काम सुरू केले असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डिलायला लोबो यांनी केले. थिएटर जंक्शन ते चोपडे पुलापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून त्यासाठी यापूर्वीच जागा संपादित केलेली आहे. एकूण दीड कोटी ऊपये खर्च करून हे काम केले जाईल. थिएटर जंक्शन ते सेंट अँथनी चर्चपर्यंतचा रस्ता ऊंदीकरणासाठीही प्रयत्न केले जातील, असेही आमदार लोबो यांनी सांगितले. सरपंच वेर्णेकर यांनीही विचार मांडले. विल्यम फर्नांडिस यांनी आभार मानले.