प्रतिनिधी / बेळगाव
पीएफआय व एसडीपीआय या संघटनांवर देशभरात एनआयए व ईडीच्या धाडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी पीएफआयच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको केला.
यावेळी आरएसएस विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वारंवार समज देऊनही कार्यकर्ते महामार्गावर ठाण मांडून होते. बर्डे ढाब्याजवळ रास्तारोको करण्यात आला. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पोलिसांनी मनधरणी करूनही रास्तारोको सुरूच ठेवल्यामुळे पीएफआयचा स्थानिक अध्यक्ष नाविद कटगीसह दहा जणांना काकती पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतुकीसाठी महामार्ग मोकळा झाला.