करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका व शहर रस्त्यासाठी तसेच वीज पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कामासाठी निधी मागणारे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहर प्रमुख संजय शीलवंत, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे करमाळा समन्वयक दीपक पाटणे, झरे येथील उद्योगपती नारायण शेठ, आंमरुळे प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, आरोग्य मंत्री प्रा तानाजीराव सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा शिवाजीराव सावंत ,बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आमदार भारत शेठ गोगावले आदी नेते मंडळी उपस्थित होते.
ते विशेष दुरुस्ती अंतर्गत करमाळा, बोरगाव, घारगाव जिल्हा रस्त्यासाठी तीन कोटी 25 लाख रुपये, बोरगाव, करंजे, मिरगव्हाण ,कोळगाव, निमगाव, वरकुटे ,कोरटी, निंबोरे, जेऊर यामध्ये सुधारणा करणे ,यासाठी एक कोटी रुपये, पाथर्डी रस्ता दुरुस्त करणे दोन कोटी रुपये,तसेच 25 15 ग्रामीण विकास निधी अंतर्गत हिवरवाडी चिमाजी मेरगळ वस्ती रस्ता करणे चाळीस लाख, पिंपळवाडी येथे गावांतर्गत रस्ते करणे दहा लाख, वडगाव येथे रस्ते करणे दहा लाख, रायगाव थांबा ते धनगर वस्ती रस्ता दहा लाख, हनुमान मंदिर ते मज्जित सिमेंट रस्ता बसवणे दहा लाख, रायगाव तुळजाभवानी मंदिर रस्ता दहा लाख ,बाळू पाटील ते मारुती मंदिर रस्ता दहा लाख अशाप्रकारे निधी मागण्यात आला आहे.
शिवाय उमरड ते झरे या रस्त्याची विशेष दुरुस्ती करण्यासाठी चाळीस लाख रुपये मागणी करण्यात आली आहे. याशिवाय करमाळा तालुक्यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करून या योजनेचे पाणी कुकडी चॅनल द्वारे संपूर्ण तालुक्यातील 25 हजार हेक्टर जमीन मुलीचा खाली आणण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठकीच्या आयोजन करावे अशी मागणी चिवटे यांनी केली. यावरील तात्काळ बैठक लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. करमाळा नगरपालिकेच्या दहा कोटी रुपयांच्या विकास कामावर आलेली स्थगिती उठवल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले . सोलापूरच्या दौऱ्याला आल्यानंतर करमाळ्याला नक्की येऊन कमला भवानी देवीचे दर्शन घेऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.