उपनगरांमध्येही पाणी साचून, खानापुरात 64.9 तर बेळगाव तालुक्मयात 31.6 मि. मी. पावसाची नोंद
प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाऊस थांबला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाबरोबरच जनताही तणावाखाली आली आहे. या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर विविध भागात पाणी साचून पिके वाया जाण्याची शक्मयता आहे. गेल्या 24 तासांत बेळगाव तालुक्मयात 31.6 मि. मी. तर खानापूर तालुक्मयात सर्वाधिक 64.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
काही ठिकाणी गटारी भरून अनेकांच्या घरात पाणी शिरले. सकाळच्या सत्रात मुसळधार पावसानंतर दुपारी काहीवेळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, त्यानंतर पुन्हा दमदार सरी कोसळल्या.
शहरातील भाजीविपेते, फेरीवाले व इतर बैठे व्यापाऱयांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ग्रामीण भागाबरोबरच उपनगरातील जनतेनेही शहराकडे येण्याचे टाळले. त्यामुळे भाजीविपेते तसेच इतर व्यापाऱयांना ग्राहकांची वाट पहात थांबावे लागले. भरपावसामध्ये हा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे काही जणांनी कमी दराने भाजी तसेच इतर वस्तू विक्री करून घर गाठणे पसंत केले.
दमदार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. त्यामधून वाट काढताना कसरत करावी लागत होती. महाद्वार रोड परिसरातही काही घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे पाणी काढण्यासाठी महिला तसेच मुलांची तारांबळ उडाली.
येळ्ळूर रस्त्यावर पाणी
येळ्ळूर रस्त्यावरील केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर या परिसरात पाणी साचून होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. वडगाव, आनंदनगर परिसरातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा प्रवाह आल्यामुळे येळ्ळूर रस्त्यावर गुडघाभर पाणी आले होते. त्यामधून वाहन चालविणे कसरतीचे होत होते. येळ्ळूर रस्त्याला लागून असलेल्या गटारीवर अनेक ठिकाणी सीडीचे काम झाले नाही. त्यामुळे गटारीतील पाणी रस्त्यावरून वाहत होते.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे गटारी बुजल्या आहेत. मध्यंतरी जेसीबीच्या साहाय्याने गटारी काढल्या तरी काही ठिकाणी ये-जा करण्यासाठी रस्ता करताना त्या ठिकाणी पाईप योग्यप्रकारे घातले गेले नाहीत. तर काही जणांनी गटारीवरच काँक्रिट तसेच फरशी बसविली आहे. त्यामधून पाणी पुढे जाणे अवघड जात आहे. तेव्हा तातडीने आनंदनगरपासून बळ्ळारी नाल्यापर्यंत मोठी गटार काढावी, अशी मागणी होत आहे.
भातपीक पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे आता शिवारामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे भातपीक कुजून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी बळ्ळारी नाला परिसरातील हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली होती. अधिक पाऊस झाल्यामुळे बटाटा आणि सोयाबीन पीकही खराब होण्याची भीती शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यास पाणीपुरवठय़ात व्यत्यय
बेळगाव ः गेल्या आठवडय़ापासून महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राकसकोप धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत असून कोणत्याहीक्षणी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरण्याची शक्मयता असून पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होऊ शकतो.
प्रशासनाने गुरुवारी रात्री पत्रकाद्वारे ही माहिती दिली. जर हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले तर पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित होणार असून शिरलेले पाणी कमी होईपर्यंत शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय येऊ शकतो, असे स्पष्ट केले. पाणीपुरवठय़ात व्यत्यय झाल्यास नागरिकांनी एलऍण्डटी कंपनीशी सहकार्य करण्याचे आवाहन केयुआयडीएफसीचे व्यवस्थापक संतोष कावी यांनी पत्रकाद्वारे केले.
राकसकोप जलाशय भरण्याच्या मार्गावर
साडेचार फूट पाण्याची गरज : मार्कंडेय नदीतून होणार पाण्याचा विसर्ग
वार्ताहर / तुडये
राकसकोप जलाशय परिसरात बुधवारी दमदार पाऊस झाल्याने 24 तासांत पाणीपातळी साडेतीन फुटाने वाढली. गुरुवारी सकाळी 2470 फूट पाणीपातळीची नोंद झाली. तर 87.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. एकूण 909.1 मि. मी. पाऊस झाला आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही साडेचार फूट पाण्याची आवश्यकता आहे.


जलाशयाला मिळणाऱया सर्वच नाल्यातून पाण्याचा मोठा ओघ येत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता दिवसभरात अर्धाफुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. 2470.50 पाणीपातळी झाली आहे.
जलाशय स्थापनेपासून 1984 सालापर्यंत पाणीपातळी 2470 इतकी होती. ही जुनी पाणीपातळी गुरुवारी सकाळी पूर्ण झाल्याने पाणी आता वेस्टवेअरच्या सहा दरवाजापर्यंत पोहोचले आहे. यापुढील पाणीपातळी ही 5 फूट असून शुक्रवारी सकाळपर्यंत पाणीपातळीत फूटभर वाढ होणार आहे.
शुक्रवारी दरवाजे उघडणार
वाढीव पाणी साठय़ाकरिता मार्कंडेय नदीवरील उभारलेल्या वेस्टवेअरच्या सहा दरवाज्यांची उंची पाच फुटाने वाढविल्याने ओव्हरफ्लोची पाणीपातळी 2480 फूट आहे. जलाशय पाणीपातळी ही 2475 फुटावर ठेवावी लागणार असल्याने पाणीपातळी 2472 फूट होताच दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे मार्कंडेय नदीतून जलाशयाच्या पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे मार्कंडेय नदी पात्राशेजारील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जलाशय परिसरात 1 जुलैपासून आजपर्यंत 529.4 मि.मी. पाऊस झाला आहे. तर 17.85 फूट पाणीपातळीत वाढ झाली आहे.
पाऊस व पाणीपातळीत झालेली वाढ
दिनांक | पडलेला पाऊस | पाणीपातळी |
09/07/22 | 38.1 मि.मी. | 2459.4 फूट |
10/07/22 | 47.3 मि.मी. | 2461.50 फूट |
11/07/22 | 23.5 मि.मी. | 2463 फूट |
12/07/22 | 47.8 मि.मी. | 2464.80 फूट |
13/07/22 | 51.4 मि.मी. | 2466.70 फूट |
14/07/22 | 87.4 मि.मी. | 2470 फूट |
6 वाजता | 2470.50 फूट |