वृत्तसंस्था/ दर्बान
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने शुक्री कोनार्द आणि रॉब वॉल्टर यांची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या संघाचे शुक्री कोनार्द हे विद्यमान प्रमुख प्रशिक्षक आहेत.
रॉब वॉल्टर हे सध्या न्यूझीलंडमधील सेंट्रल ड्रिस्ट्रीक्ट संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आता वॉल्टर आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा देऊन ते लवकरच दक्षिण आफ्रिकेत दाखल होतील. दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू क्लुसनर यांनी प्रमुख प्रशिक्षक पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने कोनार्द आणि वॉल्टर यांची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. गेल्या वर्षी मार्क बाऊचर यांनी प्रशिक्षक कालावधीतून निवृत्ती पत्करली होती. बाऊचर यांची 2019 डिसेंबर रोजी चार वर्षांच्या कालावधीकरिता दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचा कालावधी समाप्त झाल्याने आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला नवे प्रशिक्षक लाभणार आहेत.