Tarun Bharat

रत्नागिरीनजीक चाकूचा धाक दाखवून दुकानात लूटमार

मिरजोळे एमआयडीसी येथील प्रकार; दोघा सराईत गुन्हेगारांना अटक, पोलीस कोठडी

Advertisements

रत्नागिरी प्रतिनिधी

शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील दुकानात तरूणीला चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा संशयितांना अटक केली. शुक्रवारी संशयितांना 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शाहीद सादीक मुजावर (32, धनजीनाका रत्नागिरी) व फुरकान यासीन फणसोपकर (30, कोकणनगर रत्नागिरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजोळे एमआयडीसी येथे राहुल स्नॅक दुकानात 28 सप्टेंबर रोजी 17 वर्षीय तरूणी एकटी असल्याचे पाहून दोन्ही संशयित दुचाकीवरून दुकानात आल़े. आपण पोलीस असून दुकानात गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली आह़े. त्याची तपासणी करावयाची आहे, अशी बतावणी त्यांनी केल़ी. दुकानातील तरूणी विरोध करत असल्याचे लक्षात येताच शाहीदने तरूणीला धक्का देत जबरदस्तीने दुकानात प्रवेश केल़ा फुरकानने स्वत:कडील धारदार चाकू काढत ओरडलीस तर ठार मारण्याची धमकी तरूणीला दिल़ी. तरूणीला एका बाजूला करत शाहीदने दुकानाच्या गल्ल्यातील 4 हजार रूपये काढून घेतले व दोन्ही संशयितांनी दुचाकीवरून पोबारा केल़ा.

या प्रकरणी तरूणीने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 397,170,506 सह 34 नुसार गुन्हा दाखल केल़ा पोलिसांच्या तपासात हा गुन्हा शाहीद व फूकरान यांनीच केल्याचे निष्पन्न झाल़े त्यांच्याकडून एक चाकू, ज्युपिटर गाडी व रोख रक्कम 1 हजार हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल़े.

Related Stories

जिह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 92.33 टक्क्यांवर

Patil_p

चवेत ग्रामसेवक, दापोलीत तलाठय़ासह मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळय़ात

Patil_p

अखेर मान्सून दाखल… नागरिकांची धावपळ

Patil_p

चिपळुणातील डॉक्टरच्या संपर्कात तब्बल 128जण!

Patil_p

आंजर्ले खाडीत बंद बोटीला आग

Patil_p

दोन हजार वर्षे टिकणारा शिवपुतळा अखेर दापोलीत दाखल

Patil_p
error: Content is protected !!