Tarun Bharat

मध्यरात्री देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा

Advertisements

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : 

औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर (Devagiri Express) मध्यरात्री 8 ते 9 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा (robbery) टाकला. या दरोडेखोरांनी S5 ते S9 दरम्यानच्या रेल्वे डब्यांमधील महिलांचे दागिने, पर्स, प्रवाशांचे मोबाईल तसेच अन्य वस्तू चोरून नेल्या. पोटूळ (potul) येथील रेल्वेस्थानकाजवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, देवगिरी एक्स्प्रेस औरंगाबादहून मनमाडला रवाना झाल्यानंतर मध्यरात्री पोटूळ स्थानकाजवळ दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधले. त्यामुळे एक्स्प्रेस चालकाला तेथील सिग्नल बंद दिसले. त्याने रेल्वे थांबवताच S5 ते S9 दरम्यानच्या डब्यांवर तुफान दगडफेक सुरू झाली. डब्यांमध्ये 8 ते 9 दरोडेखोरांनी प्रवेश करत झोपेतील महिला प्रवाशांच्या अंगावरील दागिने ओढण्यास सुरुवात केली. मोबाईल, पर्सही हिसकावल्या. प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याने कुणालाही घटना कळली नाही. अर्धा तास हा प्रकार सुरू होता. त्यानंतर रेल्वे मनमाडला रवाना झाली. 

दरम्यान, घटनास्थळी एक रुग्णवाहिका उभी होती. त्यामुळे हे दरोडेखोर रुग्णवाहिकेतून आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Stories

अतिवृष्टीनंतर शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

Rohan_P

बलात्काराची धमकी देत चोरी

Patil_p

जागतिक बुद्धिबळदिनानिमित्त सांगलीमधून विविध ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय शुक्रवार पासून सुरळीत होणार

Abhijeet Shinde

विरोधकांच्या टीकेनंतर मंत्रिस्तरावरील अधिकारांबाबत मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “सचिवांना केवळ…”

Abhijeet Shinde

Google ने केलं कॉफी एस्प्रेसो मशीन्सच्या जनकाला अभिवादन

Kalyani Amanagi
error: Content is protected !!