Tarun Bharat

समुद्रातून प्लास्टिक हटविणार रोबो फिश

13 मिमी लांबीचा रोबोटिक मासा

जगात प्लास्टिकचे प्रदूषण वाढत चालले आहे. यामुळे समुद्रातील मायक्रोप्लास्टिक हटविण्यासाठी चीनच्या सिचुआन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एक रोबोट फिश तयार केला आहे. हा फिश पाण्यात पोहून प्लास्टिकचे तुकडे एका ठिकाणाहून उचलत दुसऱया ठिकाणी ठेवण्यास सक्षम आहे.

Advertisements

मायक्रोप्लास्टिक 5 मिलिमीटर किंवा त्याहून छोटय़ा प्लास्टिकचे तुकडे असतात. या तुकडय़ांना भिंगाशिवाय पाहणे अवघड असते. वैज्ञानिक या पार्टिकल्सच्या प्रभावाला कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पार्टिकल्स पाणी, अन्नधान्य आणि जमिनीच्या पृष्ठभागावर असतात.

रोबो फिश केवळ 13 मिलिमीटर लांब आहे. याच्या शेपटात लेझर लाइट सिस्टीम असून याच्या मदतीने तो पोहू शकतो आणि एका सेकंदात सुमारे 30 मिलिमीटरपर्यंत पुढे जाऊ शकतो. रोबोटसाठी संशोधकांनी विशेष सामग्री वापरल्याने हा मासा अत्यंत फ्लेक्सिबल ठरला आहे.

रोबो फिश एकावेळी 5 किलोग्रॅमपर्यंत प्लास्टिक उचलू शकतो. याचबरोबर हा मायक्रोप्लास्टिकच्या तरंगत्या तुकडय़ांना शोधून घेतो. रोबो फिश सेल्फ-हील म्हणजेच स्वतःचे घाव भरण्यास सक्षम आहे. याकरता वापरण्यात आलेल्या सामग्रीच्या मदतीने तो डॅमेज झाल्यावर 89 टक्क्यांपर्यंत आपोआप बरा होतो. समुद्राच्या वातावरणात अनेकदा रोबोट्स खराब होण्याची भीती असे संशोधक युयान वँग यांनी म्हटले आहे.

समुद्रात मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक

समुद्रात दरवर्षी 50 लाख ते 1.3 कोटी मेट्रिक टन प्लास्टिक प्रदूषण वाढत आहे. हे प्लास्टिकच्या अवशेषांपासून मायक्रोप्लास्टिक देखील असते. ऑक्टोबर 2021 पर्यंत समुद्रात सुमारे 24 लाख कोटी मायक्रोप्लास्टिकचे तुकडे आहेत. हे प्लास्टिक सागरी जीवांपासून माणसांसाठीही धोकादायक असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

Related Stories

एसयुव्ही-मोठय़ा गाडय़ांच्या हेडलाइटची समस्या

Patil_p

जपानमध्ये विदेशी शहरांच्या प्रतिकृती

Patil_p

अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात होण्याऱ्या उपासमारीला रोखा: UN प्रमुख

Abhijeet Shinde

इस्रायल : सरकार कठोर

Patil_p

इस्रायलमध्ये नाफ्ताली बेनेट यांचे सरकार स्थापन

Patil_p

भारत तटस्थ, जपानने बदलली योजना

Patil_p
error: Content is protected !!