Tarun Bharat

‘रॉकेट बॉयज 2’ येतोय

Advertisements

पोखरण अणुचाचणी अन् इंदिरा गांधींसह परततेय सीरिज

जिम सर्भ आणि इश्वाक सिंह यांची मुख्य भूमिका असलेली वेबसीरिज ‘रॉकेट बॉयज’ला मोठी पसंती मिळाली होती. आतुरतेने या सीरिजच्या दुसऱया सीझनची प्रतीक्षा करत असलेल्या चाहत्यांना खूषखबर आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हने रॉकेट बॉयज 2 चा टीझर शेअर केला आहे.

सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये भारताचे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर भाभा (जिम सर्भ) आणि डॉक्टर विक्रम साराभाई (इश्वाक सिंह) यांच्या प्रवासासह देशाची आण्विक महाशक्ती होण्यासाठीचा प्रवास सुरू झाल्याचे दाखविण्यात आले होते. या सीरिजमध्ये अर्जुन राधाकृष्णनने एपीजे अब्दुल कलाम यांची भूमिका साकारली होती.

रॉकेट बॉयज 2 या सीझनमध्ये ही तिन्ही वैज्ञानिकांचा पुढील प्रवास दर्शविण्यात येईल. याचबरोबर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत अभिनेत्री चारू शंकर दिसून येणार आहे. या सीझनमध्ये भारताची पहिल्या अणुचाचणीची कहाणी असणार आहे. या अणुचाचणीला पोखररण न्युक्लियर टेस्ट किंवा ऑपरेशन स्मायलिंग बुद्धा या नावानेही ओळखले जाते.

टीझरच्या प्रारंभी तिन्ही वैज्ञानिकांच्या भूमिकेतील कलाकार दिसून येतात, त्यानंतर अणुचाचणीच्या स्फोटाचा आवाज ऐकू येतो. यात ‘भारत को डराया नहीं जा सकता हम जरुरी ऍक्शन लेने के लिए तैयार है’ असा डायलॉग आहे.

Related Stories

ललित – सईची कलरफुल लव्हस्टोरी

Patil_p

रविनाची वेबसीरिज 10 डिसेंबरला ओटीटीवर

Amit Kulkarni

‘अन्य’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

tarunbharat

‘दसवीं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

खेतानींच्या आगामी चित्रपटात तारा

Patil_p

10 जूनला झळकणार ‘जनहित में जारी’

Patil_p
error: Content is protected !!