ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Roger Binny new president of BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिन्नी यांनी बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदाची सुत्रे हाती घेतली. बिन्नी हे बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष ठरले आहेत.
बिन्नी सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. याआधी ते बीसीसीआयच्या निवड समितीचाच एक भाग होते. बिन्नी यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी एकटय़ाने नामांकन केले होते. त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित मानले जात होते. केवळ औपचारिकता म्हणून बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. रॉजर बिन्नी यांनी 1979 ते 1987 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीही टीम इंडियाकडून खेळला आहे. स्टुअर्ट बिन्नींच्या निवडीदरम्यान रॉजर बिन्नींवर मुलाला भारतीय संघात स्थान मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
अधिक वाचा : TET परीक्षेत गैरप्रकार, 9500 उमेदवारांवर कारवाई
1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा रॉजर बिन्नी हे महत्वाचे भाग होते. या विश्वचषकात त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. बिन्नी यांनी क्रिकेटच्या कारकिर्दीत 27 कसोटी सामन्यात 830 धावा तर 72 एकदिवसीय सामन्यात 629 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे. 27 कसोटीमध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत. तर 72 एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स घेतल्या आहेत.