ओम साई चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी व एमसीसीसी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओम साई चषक 14 वर्षाखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून रॉजर क्रिकेट क्लब संघाने एमसीसीसी संघाचा 7 गडय़ांनी पराभव करून सलग दुसरा विजय संपादन केला. अमर नाईकला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
फिनिक्स पब्लिक रेसिडेन्सी स्कूलच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत एमसीसीसी संघाने 25 षटकात सर्वबाद 125 धावा केल्या. इरफानने 5 चौकारासह 52 धावा केल्या. रॉजरतर्फे श्रेया पोटेने 18 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर संघाने 19.5 षटकात 3 बाद 127 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. अमर नाईकने 9 चौकारासह 51 धावा तर अविनाशने 3 चौकारासह 28 धावा केल्या.
गुरूवारचे सामने – किंग्स वि. एमसीसीसी सकाळी 9 वाजता, किंग्स वि. रॉजर क्रिकेट क्लब दुपारी 1.30 वाजता.