Tarun Bharat

रोहन बोपण्णा पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ पॅरिस

भारताच्या रोहन बोपण्णाने दुहेरीत सात वर्षांनंतर प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत डच जोडीदार मॅटवे मिडेलकूपसमवेत खेळताना त्याने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

बोपण्णा-मिडेलकूप जोडीने ब्रिटनचा लॉईड ग्लासपूल व फिनलँडचा हेन्री हेलिओव्हारा यांच्यावर 4-6, 6-4, 7-6 (7-3) अशी संघर्षपूर्ण मात केली. बोपण्णाने 2015 मध्ये विम्बल्डन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. त्यावेळी रोमानियाच्या फ्लोरिन मर्जियासमवेत तो खेळला होता. मात्र पाच सेट्सच्या संघर्षपूर्ण उपांत्य लढतीत त्यांना जीन ज्युलियन रॉजेर व होरिया तेकॉ यांच्याकडून हार पत्करावी लागली होती. येथे त्यांची उपांत्य लढत 12 व्या मानांकित मार्सेलो ऍरेव्हालो व जीन ज्युलियन रॉजेर यांच्याशी गुरुवारी होणार आहे.

बोपण्णा-मिडेलकूप यांनी पहिला सेट प्रारंभी आघाडी घेऊनही गमविला. पण झुंजार खेळ करीत नंतरचे दोन सेट्स जिंकून त्यांनी शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. यातील शेवटचा सेट अतिशय चुरशीचा झाला. 3-5 अशा पिछाडीवरून त्यांनी हा सेट सुपर टायब्रेकमध्ये नेला. टायब्रेकमध्येही ते 0-3 असे मागे पडले होते. पण नंतर सलग दहा गुण घेत सेटसह सामना जिंकून आगेकूच केली. गेल्या शनिवारी बोपण्णा-मिडेलकूप यांनी विद्यमान विम्बल्डन चॅम्पियन मेट पॅव्हिक व निकोला मेक्टिक यांना पराभवाचा धक्का देताना पाच मॅचपॉईंट्स वाचविले होते.

Related Stories

आकाश चोप्राच्या आयपीएल संघाचे नेतृत्व धोनीकडे

Patil_p

लॅथम, विल्यम्सन यांची दमदार शतके

Patil_p

इंग्लंडकडून 112 वर्षांचा जुना विक्रम मोडीत

Amit Kulkarni

दीड तासात फळली हजार दिवसांची प्रतीक्षा!

Amit Kulkarni

मॉरिन्हो रोमा संघाचे नवे प्रशिक्षक

Patil_p

भारतीय संघासाठी दोन आठवडय़ांचे क्वारंटाईन

Patil_p