प्रतिनिधी /वाळपई
शेळप खुर्द सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या पालकांचे महत्वाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची नवीन समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्षपदी रोहिदास नकुल गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रंजीता प्रभू यांची खास उपस्थिती होती.
शाळेचे व्यवस्थित व्यवस्थापन व्हावे व शैक्षणिक विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात संदर्भात पालकांनी यावेळी सविस्तरपणे चर्चा केली.
गेल्या तीन वर्षापासून विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागत असल्याबाबत पालकांनी शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयाची प्रगती हीच खरी ग्रामीण भागाची ओळख आहे. यामुळे येणाऱया काळात विद्यालयाचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी येणाऱया काळात राबविण्यात येणाऱया उपक्रमांना पालकांनी विशेष सहकार्य करावे असे आवाहन रोहिदास गावकर यांनी केले. सूत्रसंचालन किरणजी पाटील यांनी केले तर परेश चावडीकर यांनी आभार मानले.