Tarun Bharat

राज्यपालांचा इतिहास कच्चा; रोहित पवारांचा निशाणा

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचे. पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी ( Rohit Pawar) केली. रोहित पवारांनी ट्विट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर (governor) निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही. आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब ( Rohit Pawar Slammed Bhagat singh ) आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाबद्दल ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत, “राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो आहे. नरेंद्र मोदी हे मोठे नेते असून, देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.”

“आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही, तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरिकांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीनं करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे”, अशी टीका रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.

Related Stories

“मोदी सुद्धा थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात सत्ता, पॉवर”

Abhijeet Shinde

थकबाकीदारांचे होणार पाणी कनेक्शन कट

Patil_p

हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड; ५० ते ६०जण अडकल्याची शक्यता

Abhijeet Shinde

जगभरात अडकलेल्या 14 हजार भारतीयांची होणार घरवापसी

datta jadhav

नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत वाढ

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात कधी होणार मान्सूनचे आगमन; IMD विभागाची अपडेट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!