Tarun Bharat

रोहित शर्मा कोरोनाबाधित

Advertisements

वृत्तसंस्था/ बर्मिंगहम

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली असल्याचे रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये आढळून आल्यानंतर त्याला सहा दिवसासाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याचे बीसीसीआयने रविवारी सांगितले.

भारत व इंग्लंड यांच्यात लांबणीवर पडलेली पाचवी कसोटी 1 जुलैपासून येथे होणार असून रोहित पूर्ण फिट झाल्यास तो या कसोटीत खेळू शकेल. तो उपलब्ध न झाल्यास रिषभ पंत किंवा जसप्रित बुमराह या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल. भारत व लिसेस्टरशायर यांच्यातील सराव सामन्यात रोहितने पहिल्या दिवशी फलंदाजी केली होती. पण दुसऱया दिवशी तो मैदानात उतरला नव्हता. याशिवाय भारताच्या दुसऱया डावातही त्याने फलंदाजी केली नाही.

Related Stories

ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात धावांचा डोंगर

Patil_p

आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनची चुनी गोस्वामीना श्रद्धांजली

Patil_p

सहा राज्यांतील मुलांचा सचिन बनला तारणहार

Patil_p

झेकच्या क्विटोव्हाची स्पर्धेतून माघार

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा अर्जेंटिनावर विजय

Patil_p

नीरज चोप्रा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p
error: Content is protected !!