Tarun Bharat

रोहित शर्माचे 500 षटकार

ढाका : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा हा भारताचा पहिला फलंदाज आहे.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱया सामन्यात रोहित शर्माने 500 षटकारांचा टप्पा गाठला. या सामन्यात त्याने केवळ 28 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 51 धावा जमविल्या होत्या. पण त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने हा सामना आणि मालिका गमावली असली तरी रोहित शर्माने उपस्थितांना आपल्या फटकेबाजीने खुश केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार नोंदविणाऱयांत विंडीजचा ख्रिस गेल (553)हा पहिल्या क्रमांकावर आहे.

Related Stories

लखनौ-आरसीबी ‘सुप्रीमसी बॅटल’ आज

Patil_p

भारत-श्रीलंका दिवस-रात्र कसोटी आजपासून

Patil_p

ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्राची दमदार सुरुवात

Patil_p

आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून

Patil_p

कॅरोलिना मॅरीन, ऍक्सलसन बॅडमिंटन विजेते

Patil_p

भारतीय मुष्टियोद्धय़ांसाठी यंदा भरगच्च हंगाम

Omkar B