चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या धमाकेदार ऍक्शनपटांसाठी ओळखला जातो. गोलमाल, सिंघम, सिंबा, चेन्नई एक्स्प्रेस, सर्कस असे अनेक चित्रपट रोहितने दिग्दर्शित केले आहेत. उत्तम कथानक, कॉमेडी आणि धमाकेदार ऍक्शनदृश्यांनी तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणाऱया रोहितने आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे.
‘स्कुल, कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटाची त्याने निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रोहितने सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत याची माहिती दिली आहे. ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटाचे कथानक शाळा, महाविद्यालयीन जीवनामुळे व्यक्तीची होणारी जडणघडण आणि आयुष्याला मिळणारं वळण यावर आधारित आहे. एका व्यक्तीचा शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाचा प्रवास या चित्रपटातून पडद्यावर दाखविण्यात आला आहे. रोहितच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशीने केले आहे.
रोहित शेट्टीच्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटात जितेंद्र जोशी, करण किशोर आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांच्या मुख्य भूमिका आहेत. याचबरोबर वनिता खरात, प्रसाद जवादे हे कलाकारही यात दिसून येतील. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.