तेलंगणाच्या शमशबाद येथून पदयात्रा रवाना
वृत्तसंस्था/ शमशाबाद
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेचा मंगळवारी 55 वा दिवस होता. तेलंगणाच्या शमशाबाद येथे या पदयात्रेत हैदराबाद विद्यापीठ परिसरात आत्महत्या केलेला विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आईने भाग घेतला आहे. राहुल गांधी यांच्यासोबत रोहित वेमुलाच्या आईने पदयात्रेत भाग घेतला.
राधिका वेमुला यांनी भारत जोडो यात्रेत सामील झाल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. भारत जोडो यात्रेबद्दल एकजुटता दाखविल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
राज्यघटनेला भाजप-संघाच्या आक्रमणापसून वाचविण्याचे, रोहित वेमुलाला न्याय मिळवून देण्याचे आवाहन राहुल गांधी यांना केले आहे. न्यायपालिकेत दलितांचे प्रतिनिधित्व वाढविण्याचे आणि सर्वांसाठी शिक्षण सुनिश्चित करण्याचे आवाहन राहुल गांधींना केल्याचे राधिका वेमुला यांनी म्हटले आहे.