ऍमस्टरडॅम / वृत्तसंस्था
आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी नेदरलँड्स संघात अष्टपैलू रोलेफ व्हान डेर मेर्वे व कॉलिन ऍकरमन यांचे पुनरागमन झाले आहे. अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत या दोन्ही खेळाडूंनी लक्षवेधी योगदान दिले होते. नेदरलँड्स संघाचे नेतृत्व स्कॉट एडवर्ड्सकडे सोपवले गेले असून ब्रेन्डॉन ग्लोव्हर, टिम व्हान डेर ग्यूटेन, लोगन व्हान बीक, पॉल वहान मीकेरेन असे पेसर्स या संघात उपलब्ध आहेत. नेदरलँड्सने बुलावायो येथील पात्रता स्पर्धेच्या माध्यमातून वर्ल्डकप तिकीट निश्चित केले आहे. यंदाची आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा दि. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.