वृत्तसंस्था/ लंडन
रविवारी ओल्ड ट्रफोर्डच्या मैदानावर होणाऱया मँचेस्टर युनायटेड आणि रेयो व्हॅलेकेनो यांच्यातील मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात पोर्तुगालचा अव्वल जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सहभागी होणार आहे.
37 वर्षीय रोनाल्डोला यापूर्वी मँचेस्टर युनायटेडच्या थायलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱयाला काही वैयक्तिक समस्येमुळे मुकावे लागले होते. गेल्या वर्षी रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडशी करार केला आहे. तो हा क्लब सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. पण, अद्याप त्याबाबत काही तपशील देण्यात आलेले नाहीत.
शनिवारी मँचेस्टर युनायटेड संघाचा ओस्लो येथे ऍटलेटिको माद्रिद संघाबरोबर मित्रत्वाचा फुटबॉल सामना खेळविला जाणार असून या सामन्यासाठी रोनाल्डोला वगळण्यात आले होते. दरम्यान रविवारी होणाऱया ला लिगा स्पर्धेत सहभागी होणाऱया रेयो व्हॅलेकेनो संघाविरुद्ध मित्रत्वाच्या सामन्यासाठी आपण उपलब्ध राहणार असल्याचे रोनाल्डोने इन्स्ट्राग्रामवर म्हटले आहे. इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या मोहिमेला मँचेस्टर युनायटेडचा संघ 7 ऑगस्टपासून प्रारंभ करणार असून त्यांचा सामना ब्रिटॉनशी होणार आहे.