Tarun Bharat

छप्पर कोसळले;महिला सुदैवाने बचावली

मालवण / प्रतिनिधी-

मालवण शहरातील बंदर जेटी मांडवी वाडा येथे घराचे छप्पर कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यावेळी घरात असलेल्या मीना लुगेरा यांच्या हातावर विटा कोसळल्या मात्र सुदैवाने त्या बचावल्या.छप्पर कोसळलेले घर मार्शलीन घाब्रियल डिसोझा कुटुंबीय यांचे असून ते देवगड येथे राहतात अशी माहिती उपस्थितांनी दिली. दरम्यान मीना लुगेरा यांच्या घराचे काम चालू असल्याने त्या आपला मुलगा प्रियेश याच्या सोबत डिसोझा यांच्या घरात राहत होते.

शुक्रवारी दुपारी मीना या जेवण घेऊन स्वयंपाक घराच्या बाहेरील खोलीत येत असताना छप्पराचा आवाज झाला व काही विटा मीना यांच्या हातावर पडल्या. त्या दुसऱ्या खोलीत पोहचताच स्वयंपाक घरातील पूर्ण छप्पर कोसळले. सुदैवाने मीना या बचावल्या. आजूबाजूचे शेजारी विली डिसोझा व कुटुंबीय, डेनिस लुगेरा व अन्य नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले.

गेले काही दिवस कोसळत असलेला मुसळधार पाऊस व वारा यामुळे नुकसानीच्या घटना घडत आहेत. या दरम्यान या छप्पर कोसळण्याच्या घटनेची नोंद शुक्रवारी झाली आहे.

Related Stories

“त्या” गणेश मूर्त्यांसाठी मिळाला निवारा; दत्ता सामंत यांची मध्यस्थी

Anuja Kudatarkar

मोरगांवचा सुपुत्र हितेंद्र कदमला बेस्ट पोजरचा किताब

Anuja Kudatarkar

डॉ. संघमित्रा फुले प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नियुक्त

Archana Banage

सिंधुदुर्गचे नवे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे

NIKHIL_N

जिह्यात कमी चाचण्यामुळे रूग्णसंख्येत घट

Patil_p

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विलगीकरण कक्षातील रुग्णांना सॅनिटायजर, मास्कचे वाटप

Anuja Kudatarkar