Tarun Bharat

रोटरी अन्नोत्सवाची मुहूर्तमेढ

अंगडी इंजिनिअरिंग कॉलेज मैदानावर 6 जानेवारीपासून अन्नोत्सवाला प्रारंभ

प्रतिनिधी /बेळगाव

रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित ‘अन्नोत्सव 2023’ चा मुहूर्तमेढ कार्यक्रम नुकताच पार पडला. अंगडी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर दि. 6 जानेवारीपासून अन्नोत्सव भरविला जाणार आहे. या निमित्त इव्हेंट चेअरमन मनोज पै, पराग भंडारे व योगेश कुलकर्णी यांच्या हस्ते मुहूर्तमेढ करण्यात आली.

अन्नोत्सवाला दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळेच यावर्षी मोठ्या जागेत अन्नोत्सव भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी 1 लाख 50 हजाराहून अधिक नागरिकांनी अन्नोत्सवाला भेट दिली होती. त्यामुळे यावर्षी मोठ्या जागेत अन्नोत्सव होणार आहे. अंगडी कॉलेजच्या मैदानावर यावर्षी अन्नोत्सव होणार असून, पार्किंगसाठी विस्तीर्ण जागा उपलब्ध आहे. स्टॉल धारकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यावर्षी एकूण 220 खाद्य पदार्थांचे स्टॉल मांडले जाणार आहेत.

मैदानापर्यंत मोफत बसची सोय

45 मध्यम आकाराचे होल्डिंग व 8 मोठे होल्डिंग तसेच विविध वृत्तपत्र, सोशल मीडिया तसेच चॅनलद्वारे प्रसिद्धी केली जात आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा अन्नोत्सव यावर्षी होणार आहे. नानावाडी रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

600 हून अधिक कार व हजाराहून अधिक दुचाकी पार्किंग केल्या जातील याची व्यवस्था करण्यात आली आहे. काँग्रेस रोडपासून अन्नोत्सव मैदानापर्यंत प्रवाशांसाठी मोफत बसची सोय करण्यात आली आहे.

मुहूर्तमेढ कार्यक्रमाला अध्यक्ष बसवराज विभूती, जयदीप सिद्दण्णावर, सुहास चांडक, मनोज, मायकल, डॉ. व्ही. एन. देसाई, सचिन बिच्चू, नितीन शिरगुरकर, बकुळ जोशी यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Related Stories

भैरनट्टी येथे जिल्हाधिकाऱयांचे पहिले ग्रामवास्तव्य

Amit Kulkarni

शहरातील बीएसएनएलचा मोठा टॉवर हटविण्यास सुरुवात

Amit Kulkarni

तब्बल दहा महिन्यांपासून रेशनकार्डचे काम ठप्प

Patil_p

जेएनएमसीतर्फे फिट इंडिया रन मोहीम

Patil_p

लोकशाही मार्गाने सीमालढा सुरूच

Patil_p

निम्मी रक्कम भरण्याच्या ग्वाहीनंतर मटण मार्केट खुले

Patil_p