Tarun Bharat

रोटरी क्लब मिडटाऊनचा अधिकारग्रहण समारंभ

प्रतिनिधी /बेळगाव

रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच कॅम्प येथील मेसॉनिक हॉल येथे पार पडला. यावेळी अध्यक्षपदी विजय सुतार, सेपेटरीपदी आनंद गुमास्ते यांची निवड करण्यात आली. माजी प्रांतपाल रोटे. एच. एल. रवी, रोटरीचे जिल्हा गव्हर्नर दिनेश काळे यांच्या हस्ते नूतन सदस्यांना अधिकार बहाल करण्यात आले.

क्लबच्या उपाध्यक्षपदी उदयसिंग राजपूत, उपसेपेटरी गुलाबचंद चौगुले, खजिनदार नंदन बागी, सभासद सतीश नाईक, सतीश मिठारे, गिरीश कत्तीशेट्टी, उदय इदगल, अशोक मळगली, विलास बदामी, चंद्रकांत बांडगी, नीता बिडीकर यांची निवड करण्यात आली. यावेळी दिव्यांग धन्या हिला व्हिलचेअर देण्यात आली. सूत्रसंचालन राजू देशपांडे यांनी केले. अशोक मळगली यांनी आभार मानले. 

Related Stories

सैनिक-त्यांच्या कुटुंबीयांवरील हल्ले रोखा

Patil_p

विजया, एसकेई संघ विजयी

Amit Kulkarni

निपाणीत पत्रकार अशोक याळगी यांना श्रद्धांजली

Patil_p

चेनस्नॅचिंगमध्ये बेळगावचे दोन तरुण

Amit Kulkarni

अमलीपदार्थ बाळगल्याच्या आरोपातून 7 जण निर्दोष

Omkar B

ऐन हिवाळय़ातच पाणीटंचाई

Patil_p
error: Content is protected !!