प्रतिनिधी /बेळगाव
आर. आय. डिस्ट्रिक्ट 3170, बेळगावच्या रोटरी ई क्लबने बुधवारी 10 वर्षांची सेवा पूर्ण करून चार्टर नाईट साजरी केली. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱयांचा अधिकारग्रहण पार पडला. डॉ. प्रमोद हणमगोंड यांनी रोटरी ई क्लबचे अध्यक्ष आणि सागर वाघमारे यांनी सचिव म्हणून, कविता कनगण्णी यांनी खजिनदार म्हणून सूत्रे स्वीकारली. माजी प्रांतपाल आनंद सराफ यांनी सूत्रे प्रदान केली. यावेळी मावळते उपप्रांतपाल ए. जी. रो. विक्रम जैन, नूतन उपप्रांतपाल रो. संजय कुलकर्णी आणि डीजी इलेक्ट रो. वेंकटेश देशपांडे उपस्थित होते.
क्लबचे मावळते अध्यक्ष अनंत नाडगौडा यांनी स्वागत केले आणि हाती घेतलेले सर्व उपक्रम यशस्वी करण्यात मदत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. सचिव सूर्या कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले. याप्रसंगी 12 दिव्यांग लाभार्थ्यांना व्हिलचेअर देण्यात आल्या. लेनी डिकोस्टा यांनी माफक दरात या व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्या.
रो. सचिन पाटील यांना सर्वोत्कृष्ट रोटेरियन म्हणून आणि इतर सदस्यांचा त्यांच्या कामाबद्दल सत्कार करण्यात आला.