कोल्हापूर प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत रोटरी समाज सेवा पेंद्रातर्फे 24 व 25 डिसेंबर रोजी बहिरेपणा निदान आण श्रवण यंत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. महावीर कॉलेज जवळील रोटरी समाजसेवा केंद्र, माधव प्रसाद गोयंका भवन सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत होणाऱया या शिबिराचा गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी वाचा व श्रवण संस्थेचे अध्यक्ष रो. डॉ अभिजीत हावळ यांनी केले आहे. या शिबिरात तपासणीसाठी कोल्हापुरातील नामवंत तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर शिबिरात अत्यंत माफक दरात श्रवण यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चक्कर येणाऱया रुग्णांसाठीचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारी व्हीएनजी चाचणी देखील या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, तसेच या शिबिराची माहिती इतरांनी गरजूंपर्यंत पोहचवावी, असे आवाहनही डॉ. अभिजित हावळ यांनी केले आहे.