Tarun Bharat

रॉयल एनफिल्ड ब्राझीलमध्ये प्रकल्प करणार सुरु

अमेरिका युरोपसह आशियातील बाजारात स्थान करणार मजबूत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

दुचाकी निर्माता रॉयल एनफिल्डने सांगितले की ब्राझीलमधील त्यांच्या असेंबली प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. एका नियामक नोटीसमध्ये म्हटले आहे, की सीकेडी (कम्प्लिटली नॉक्ड डाउन) प्रकल्प हा कंपनीच्या लॅटिन अमेरिकेतील योजनांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे तसेच कंपनी आयशर मोटर्सचा एक भागही आहे.

प्रतिवर्ष 15,000 पेक्षा जास्त युनिट्सच्या असेंब्ली क्षमतेसह, प्लांट ब्राझीलमधील वाढत्या मागणीची पूर्तता करणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.  नवीन क्लासिक 350, मेटियर 350, द हिमालयन आणि 650 ट्विन मोटारसायकली या प्लांटमध्ये तयार करण्यात येणार आहेत.

रॉयल एनफिल्डचे सीईओ बी गोविंदराजन म्हणाले, ‘अमेरिका, युरोप आणि आशिया-पॅसिफिक सारख्या बाजारपेठांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. ब्राझील ही एक अतिशय मजबूत बाजारपेठ आहे आणि लवकरच भारताबाहेरील कंपनीसाठी सर्वात मोठी एकल बाजारपेठ बनणार असल्याचा दावा सीईओंनी केला आहे.’

Related Stories

जीप मेरिडीयनचे बुकिंग 3 मेपासून

Patil_p

टीव्हीएस मोटर्सची विक्री तेजीत

Patil_p

वाहन निर्यात 18.87 टक्क्यांनी घटली

Patil_p

स्कोडाची कुशाक जूनमध्ये बाजारात

Patil_p

‘एमजी’ची ऍडव्हान्स ग्लॉस्टर एसयूव्ही सादर

Amit Kulkarni

ट्रीम्पची ‘बोनविले बॉबर’ मोटारसायकल बाजारात

Patil_p