Tarun Bharat

आरपीडी महाविद्यालयाला नॅककडून ‘ए मानांकन’

एसकेई चेअरमन-व्यवस्थापन मंडळ कॉलेजचा दर्जा, गुणवत्ता उंचाविण्यासाठी प्रयत्नशील

बेळगाव : साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटीच्या राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला नॅक त्रिसदस्यीय समितीने चौथ्या तपासणीतून ‘ए ग्रेड’ (3.16 सीजीपीए) देऊन सन्मानित केले आहे. नॅक समितीने 8 व 9 डिसेंबर रोजी आरपीडी महाविद्यालयाला भेट दिली होती. या समितीमध्ये छत्तीसगड रायपूरच्या कलिंगा विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. बायजू जॉन अध्यक्ष म्हणून तर हैदराबाद विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे डॉ. राघव रे•ाr चंद्री हे सदस्य समन्वयक आणि मुंबईच्या रहेजा कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देबाजीत सरकार यांचा सदस्य म्हणून समावेश होता.

समितीकडून काटेकोर पाहणी

या पाहणीवेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी गार्ड ऑफ ऑनरने त्यांचे स्वागत केले. प्राचार्या डॉ. अनुजा नाईक, आयक्युएसई समन्वयक डॉ. अभय पाटील यांनी कॉलेजच्या पाच वर्षांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. समितीने बीकॉम, बीबीए, मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास विभागांना भेट दिली. तसेच क्रीडा, एनएसएस, एनसीसी, वायआरसी, स्काऊट अॅण्ड गाईड, विद्यार्थी कल्याण विभाग, हॉबी सेंटर, ग्रंथालय, भाषा प्रयोगशाळा यांना भेट देऊन सर्व सुविधांची काटेकोर पाहणी केली व समाधान व्यक्त केले. या शिवाय व्यवस्थापन समिती, प्राध्यापक, कर्मचारीवर्ग, पालक, आजी-माजी विद्यार्थी यांच्याशीही संवाद साधला. एसकेईचे चेअरमन किरण ठाकुर आणि व्यवस्थापन मंडळ कॉलेजचा दर्जा आणि गुणवत्ता उंचाविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवाय त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचेच फलित म्हणून कॉलेजला ए-श्रेणी प्राप्त झाली आहे.

Related Stories

बनावट पानमसाला अन् औषधांची विषवल्ली

Amit Kulkarni

जिल्हय़ात पुन्हा कडक विकेंड लॉकडाऊन

Amit Kulkarni

ताप-सर्दी-खोकला यांच्यावरील औषधांची विक्री खुली करा

Patil_p

कंग्राळी खुर्द ग्रामस्थांच्यावतीने सरकारच्या दडपशाहीचा निषेध

Amit Kulkarni

येळ्ळूरात 28 एप्रिलला रंगणार भव्य कुस्ती मैदान

Amit Kulkarni

रिंगरोडसाठी प्रसिद्ध केलेले सर्व्हे क्रमांक

Amit Kulkarni