Tarun Bharat

आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; हातापायात ठोकले खिळे

ऑनलाईन टीम / तरुण भारत

आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बुधवार दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी रात्री राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. या बाबत मिळालेल्या माहिती अशी कि, आरटीआय कार्यकर्ते अमराराम यांचे अपहरण करून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर हल्लेखोरांनी अमरारामला बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून पलायन केले. सध्या अमराराम यांना जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

हल्लेखोरांनी आरटीआय कार्यकर्त्याच्या पायावर हल्ला करताना सळ्यांचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, त्याच्या पायात खिळे मारुन त्यांच्या पायात सळ्या आरपार घुसवल्याचं एका स्थानिक वृत्तपत्राने माहिती दिली आहेअमराराम यांनी 2 दिवसांपूर्वी दारू माफियांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती, त्यानंतर पोलिसांनी माफियांवर तत्काळ कारवाई केली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अमराराम अवैध दारू माफियांविरोधात सातत्याने पोलिसांना माहिती देत ​​होते. त्याचवेळी ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबतही त्यांनी तक्रारी केल्या होत्या.

आरटीआय कार्यकर्ते अमरराम यांनी या संपूर्ण घटनेवर सांगितलं की, जोधपूरहून गावात परतत असताना काही बदमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला, ज्यानंतर ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी लवकरात लवकर त्या हल्लेखोरांवर कारवाई करावी, असे अमराराम म्हणाले आहेत. या हल्ल्यामुळे पोलीसांसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

Related Stories

मेहुल चोक्सी अँटिग्वाहून पसार ?

Patil_p

ढिगाऱयाखाली अडकलेल्या पाच मजुरांना जीवदान

Patil_p

श्री मल्लिकार्जुन याञा महोत्सवाची रथोत्सवाने सांगता

Archana Banage

धक्कादायक ! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनाबाधित

Patil_p

कर्तव्य बजावताना महाराष्ट्र पोलिसाचा ‘कोरोना’ मुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 50 लाखांची मदत : अजित पवार

prashant_c

मराठा समाजाला दिलासा; EWS नुसार १० टक्के आरक्षण मिळणार, शासन निर्णय जारी

Archana Banage