15136.61 लाखाचे उद्दिष्ट : येत्या आठ महिन्यांत उद्दिष्ट पूर्ण करणार : आरटीओ मगदूम
प्रतिनिधी /बेळगाव
संभाव्य चौथी लाट नियंत्रणात असली तरी बेंगळूरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. यामध्ये सरकारी कार्यालयेही अपवाद नाहीत. मात्र सर्वाधिक महसूल जमा करून देणाऱया आरटीओ कार्यालयाला आता 2022-23 सालाचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारीवर्ग कामाला लागले आहेत. तातडीने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांची धडपड सुरू आहे.
बेळगाव आरटीओ विभागाला 15136.61 लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आता आरटीओ विभागाने 1261.38 लाख रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले असून आता उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांची धडपड सुरू आहे. त्यामुळे चालू वर्षांचे उद्दिष्ट अधिक असून ते जमा करण्यासाठी कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
कोरोनाचे कधी एकदा उच्चाटन होते, असेच साऱयांना वाटू लागले आहे. असे असले तरी आरटीओ कार्यालयातील महसूल गोळा करण्यामध्ये मागील वषी 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. बेळगावातही अनेक उद्योगधंद्यांनाही चांगलाच फटका बसला असून आता काही प्रमाणात आर्थिक घडी बसत आहे. बेळगाव आरटीओ विभागाला कोरोना काळात कोटींचा फटका बसला होता. त्यामुळे ही कसर भरून काढण्याचे मोठे आव्हान अधिकाऱयांसमोर उभे ठाकले होते. मात्र त्यामधूनही मागील 2021-22 सालाचे उद्दिष्ट पूर्ण करून अधिक महसूल गोळा केला होता. आता यावषीही दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत.
बेळगाव तालुक्मयातील वाहनांच्या खरेदीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून आरटीओ कार्यालयात नोंदही होत आहे. अनेक वाहनांचे थकीत करही भरण्यात येत असल्यामुळे महसुलात भर पडत आहे.
दरवषी बेळगाव आरटीओ कार्यालयात कोटींहून अधिक कर मिळत असतो. बेळगाव शहरातील व खानापूर तालुक्मयात वाहने घेण्याकडे कल वाढल्याने महसुलात वाढ होत आहे. येत्या आठ महिन्यांत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे आरटीओ शिवानंद मगदूम यांनी सांगितले.