Kolhapur Shivsena Agitation : कोल्हापुरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज, जोतिबा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो दुरुस्तीच्या नावाखाली काढून त्याठिकाणी भाजप नेत्यांचे फोटो लावण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आरटीओ कार्यालयातील राष्ट्रपुरुषांचे फोटो हटवून भाजप नेत्यांचे फोटो लावणाऱ्या अधिकाऱ्यांला निलंबित करा अशी मागणी कोल्हापुरात शिवसेनेनं केली आहे. आरटीओ कार्यालयात शिवसेनेनं आज आंदोलन केलं.
यावेळी बोलताना शिवसेना नेते संजय पवार म्हणाले, दोन महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे सांगत राष्ट्रपुरुषांचे फोटो काढून राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे फोटो लावण्यात आले आहेत. आम्हाला त्या फोटो संदर्भात काही आक्षेप नाही. मात्र राष्ट्रपुरुषांचे फोटो काढून त्या अधिकाऱ्य़ाने अपमान केला आहे. त्याला तात्काळ निलंबित करा आणि राष्ट्रपुरुषांचे फोटो पुन्हा लावा अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रपुरुषांचे फोटो हातात घेऊन घोषणा देत आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.


previous post