वृत्तसंस्था/ बॅस्टड (स्वीडन)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या नोर्डिया पुरुषांच्या खुल्या 250 आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रुबलेवने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना अर्जेंटिनाच्या कोरियाचा पराभव केला. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने स्पेनच्या ऍगटचा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.
गुरुवारी झालेल्या एकेरीच्या सामन्यात रुबलेवने फेडरिको कोरियावर 7-5, 4-6, 7-6(7-2) असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना अडीच तास चालला होता. अर्जेंटिनाच्या कोरियाने या लढतीत दुसरा सेट जिंकून रुबलेवशी बरोबर साधली होती पण तिसऱया आणि ट्रायबेकर निर्णायक सेटमध्ये रुबलेवने आपल्या अचूक आणि वेगवान सर्व्हिसच्या तसेच बेसलाईन खेळाच्या जोरावर कोरियाचे आव्हान संपुष्टात आणले. सर्बियाच्या लेस्लो डेरेने स्वीसच्या हसलेरचा 7-5, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. रुबलेव आणि डेरे यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल.
ऑस्ट्रियाचा टेनिसपटू तसेच माजी अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेता डॉमिनिक थिएमने तब्बल 14 महिन्यांच्या कालावधीनंतर टेनिस क्षेत्रात यशस्वी पुनरागमन केले आहे. या स्पर्धेत थिएमने गुरुवारी झालेल्या एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या ऍगटचा 7-6 (7-5), 3-6, 6-4 असा पराभव केला. आता ऍगटचा पुढील फेरीतील सामना अर्जेंटिनाच्या बायेझशी होणार आहे.