Tarun Bharat

एसटीच्या काही कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांसह प्रवाशांना उद्धट वागणूक

Advertisements

Rude behavior of some ST employees to passengers including students

सावंतवाडी एस टी आगारातील काही कर्मचारी प्रवाशी मार्गावर मनमानी करीत असून विद्यार्थ्यांसह प्रवाशांना उद्धट वागणूक देतात. त्यामुळे विद्यार्थ्यासह प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी व प्रवाशांनी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना घेराव घालून याचा जाब विचारला.


एस टी चे काही कर्मचारी ग्रामीण भागात नेमून देण्यात आलेल्या बस स्टाॅपवर बस न थांबविता स्टाॅपपासून काही अंतर मागे किंवा काही अंतर पुढे बस थांबवितात. तसेच बस मध्ये जागा असतानाही प्रवाशांना बसमध्ये चढू न देता तशीच बस पुढे नेतात. यावेळी विनंती करुनही महाविद्यालयीन विद्यार्थीनीं व विद्यार्थ्यांसह प्रवाशांसोबत सौजन्याने न वागता त्यांच्याशी हुज्जत घालतात.


गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार काही एस टी कर्मचाऱ्यांकडून सुरु आहे. या मनमानी कारभाराबाबत लक्ष वेधूनही काही कर्मचाऱ्यांची मुजोरी सुरूच असल्याने मनसे विद्यार्थ्यासह प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांनी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना घेराव घालून याचा जाब विचारला. यावेळी श्री बोधे यांनी संबधित कर्मचाऱ्यांना याबाबत आवश्यक त्या सूचना देऊन यापुढे असे प्रकार होणार नसल्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला.
यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष सुधीर राऊळ, युवा कार्यकर्ता साहिल तळकटकर, राकेश परब, केतन सावंत, ओमकार नवार, विशाल पंत, अमोल नाईक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि प्रवाशी उपस्थित होते.

ओटवणे / प्रतिनिधी

Related Stories

सीमाप्रश्नी केंद्राची दुटप्पी नीती

datta jadhav

नव्याने 15 पॉझिटिव्ह, 35 कोरोनामुक्त

NIKHIL_N

मास्टर ब्लास्टर सचिनकडून खास फोटो शेअर करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

Tousif Mujawar

एक कोटी 47 लाखांचे धनादेश दीड वर्षांनी सापडले!

Patil_p

लिपिक कर्मचारी दहा वर्षे विनावेतन

NIKHIL_N

आशा वर्कर्सचा 8 रोजी मोर्चा

NIKHIL_N
error: Content is protected !!