Tarun Bharat

Kolhapur : नवरदेवाची वरात मतदान कक्षाच्या दारात

नवरदेव विष्णू देशमुख घोडयावरुन मतदानासाठी मतदान केंद्रात

रुकडी वार्ताहर

हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान होत असताना येथील प्राथमिक शिक्षक संजय देशमुख यांचे चिरंजीव विष्णू यांचा विवाह18 डिसेंबररोजी म्हणजे निवडणुकीच्या दिवशीच ठरला होतां. घरात लग्नाची गडबड सुरु होती पण या लग्नाच्या गडबडीतही या घरातील सर्व मतदारानी आवर्जून वेळ काढून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. खुद्द नवरदेव विष्णू आपल्या वरातीच्या घोड्यावरून आपल्या लव्याजमासह मतदान केंद्रातंआले.नवरदेव बाहुल्यावरून थेट मतदार केंद्रात आल्याने मतदानासाठी आलेले सर्व मतदार, मतदान अधिकारी आणि पोलीसही अवाक झाले.

नवरदेवाचा मान राखत सर्वानीच या नवरदेवाला मतदान करण्यास लगेच संधी दिली. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या प्रसंगी आपल्या राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देणारया या नवरदेवाचे गावात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे खा. धैर्यशील माने या वेळी मतदान करण्यासाठी गावात आले होते ते स्वत: या नवरदेवाच्या लव्याजम्यामध्ये सहभागी झाले आणि बाराती बनून चालत मतदान केंद्रावर गेले नवरदेव विष्णू यांचे खा.माने यांनी त्याच्या कर्तरव्यदक्षतेबद्दल अभिनंदन केले.माझ्या गावच्या‌ या युवकाने आपल्य या क्रृतिने, युवकासमोर लोकशाहीतील आपल्या अधिकारा बाबतची जागरुकता कशी असावी याचे उदाहरण समोर ठेवले‌आहे. मला या युवकाचा अभिमान वाटतो अश शब्दात या नवरदेवाचे त्यांनी अभिनंदन कले.

Related Stories

गांधीनगर चिंचवाड रस्त्यावरील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली

Archana Banage

कर्नाटकातून विनापरवाना आलेल्या तरुणांवर कारवाई

Archana Banage

शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहात कोविड काळजी केंद्र; इतरांना विद्यापीठात प्रवेशबंदी

Archana Banage

पुलाची शिरोली येथे समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांना अनुदान वाटप

Archana Banage

‘दलित वस्ती’ वरून ‘समाजकल्याण’ सभेत मतभेद

Archana Banage

कोरोना संदर्भात राज्यात एकूण १ लाख १० हजार गुन्हे दाखल

Archana Banage